साखर कारखान्याचे 16 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह

मेरठ, उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर आता कोरोना संक्रमणाचे संकट आले आहे. दौराला साखर कारखान्याचे 16 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

स्थानिक प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने आता कारखान्याच्या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने दौराला साखर कारखान्यानंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या कोरोना टेस्ट चे आदेश दिले आहेत. एसडीएम सरधना अमित कुमार भारतीय यांनी सांगितले की, संक्रमित कर्मचार्‍यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन बनवले आहे. कर्मचार्‍यांना योग्य अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि सैनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना बाबत देशामध्ये वाढ दिसून येत आहे आणि दरम्यान प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here