नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये गतीने वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या शंभर पेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासांत या महामारीने ११३ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने संक्रिय रुग्ण २९०६ने वाढले आहेत. तर आतापर्यंत देशात १ कोटी ८० लाख पाच हजार ५०३ जणांचे लसीकरण केले गेले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १६८३८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या एक कोटी ११ लाख ७३ हजार झाली आहे. गेल्या २४ तासांत १३८१९ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण एक कोटी आठ लाख ३९ हजार ८९४ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. संक्रमित रुग्णांची संख्या २९०६ ने वाढून १.७६ लाख झाली आहे. या कालावधीत ११३ लोकांच्या मृत्यूसह एकूण मृत्यू संख्या एक लाख ५७ हजार ५४८ झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट घसरून ९७.०१ टक्क्यांवर आला आहे. सक्रिय रुग्ण संख्येची टक्केवारी १.५७ झाली असून मृत्यूदर १.४० टक्के आहे.
महाराष्ट्र कोरोना रुग्ण संख्येत अग्रस्थानी आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २८०३ रुग्ण आढळले आहेत. तर ही एकूण संख्या ८६३५९ झाली आहे. राज्यात ६१३५ जण बरे झाले आहेत. एकूण २०.४३९ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. तर साठहून अधिक लोकांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या ५२३४० झाली आहे.