द्वारिकेश शुगरच्यावतीने १७५ KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्लांट सुरू

लखनौ : द्वारिकेश शुगरकडून बरेली जिल्ह्यातील आपल्या फरीदपूर युनिटमध्ये १७५ किलो लिटर प्रती दिन (KLPD) डिस्टिलरी प्लांट सुरू करण्यात आला आहे. हा प्लांट २४ जून २०२२ रोजी सुरू करण्यात आला आहे. आणि इथेनॉल उत्पादन करण्यासाठी ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीसचा वापर फिडस्टॉक म्हणून करण्यात येत आहे. कंपनीची एकूण डिस्टिलरी उत्पादन क्षमता ३३७.५ किलो लिटर प्रतीदिन झाली आहे. कंपनीने सांगितले की, आता इथेनॉल उत्पादन दुप्पट होईल तर साखरेचे उत्पादन नियंत्रित केले जाणार आहे.

कंपनीची ही डिस्टिलरी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे शून्य तरल निर्वहन होईल. कंपनीने सांगितले की, प्लांटमध्ये प्रदूषण उत्सर्जन मानकांचे कठोरपणे, पूर्णपणे पालन केले जाणार आहे. द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज साखर, सहवीज निर्मिती, औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन आणि विक्री अशा सर्व व्यवसायांत कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here