कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यात चालू गळीत हंगामातील उत्पादित झालेल्या २ लाख साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याने या गळीत हंगामात ७० दिवसांत १,७६,१४० मे. टन उसाचे गाळप करून २,०५,००० मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी ११.६३ टक्के इतका आहे. यावेळी कारखान्यात वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखाना, लि. अमृतनगर, गवसे अशा नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले.
अध्यक्ष वसंतराव धुरे म्हणाले, कारखान्याने या गळीत हंगामात ३ लाख ५० हजार मे. टन गाळप करण्यासाठी नियोजन केले आहे. उत्पादकांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची रक्कम वेळीच पाठवण्यात येत आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणेची बिलेही देण्यात येत आहेत. कार्यक्रमाला उपाध्यक्ष मधुकर देसाई, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक मुकुंद देसाई, उदय पोवार, अनिल फडके, रणजित देसाई, संभाजी पाटील, राजेंद्र मुरुक्टे, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, तज्ज्ञ संचालक नामदेव नार्वेकर आदी उपस्थित होते.