पुरनपूर साखर कारखान्याच्या नुतनीकरणासाठी १८ कोटी रुपये मंजूर

पुरनपूर : पुरनपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा कायापालट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखान्याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर २०२३-२४ या आर्थिक वर्षात कार्यक्षमता सुधारणे आणि आधुनिकीकरणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी मंत्री डॉ. विनोद तिवारी यांच्या प्रयत्नातून १९८४-८५ मध्ये या सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. कारखान्याने भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. विकासाला गती दिली. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन सुरू केले. कारखान्याची गाळप क्षमता २५ हजार क्विंटल होती. मात्र गलथान कारभारामुळे गाळप क्षमता कमी होत गेली. शेतकरी नेते मनजीत सिंग यांनी सांगितले की, कारखान्याची अवस्था बिकट आहे. आमदार बाबुराम पासवान यांनी विधानसभेत साखर कारखान्याशी संबंधित समस्या मांडली. आता या कामासाठी १८ कोटींचे अनुदान मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here