सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर विभागात समाप्त झालेल्या ऊस गळीत हंगामात यावेळी १७ साखर कारखान्यांनी १,८६८ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले आहे.
याबाबत युनिवार्ता डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाचे ऊपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी मंगळवारी सांगितले की, देवबंद साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १९३ दिवस कामकाज केले. आणि ३१ मे २०२२ रोजी या कारखान्याची सत्र समाप्ती झाली आहे. देवबंद कारखान्यामध्ये १६५.२८ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले दिली आहेत. शेतकऱ्यांना ५७,४९६.९० लाख रुपये ऊस समित्यांच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत.