बदायूं : एकीकडे यदू साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहे. तर जिल्ह्यातील शुखुपूर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना तीन जानेवारीपर्यंतच्या उसाचे पैसे दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरीत पैसेही त्वरीत दिले जातील असे कारखाना प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यात दोन साखर कारखाने आहेत. यापैकी बिसौली येथे यदू साखर कारखाना आहे तर शेखुपूर शेतकरी सहकारी कारखाना आहे. जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी याच साखर कारखान्याकडे आपला ऊस पाठवतात. आणखी काही शेतकरी जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना ऊस देतात. संबंधीत कारखान्यांकडून त्याचे पैसे मिळतात. यदू साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. कारखान्याकडून शेतकऱ्यांना हळूहळू पैसे दिले जात आहेत.
दुसरीकडे शेखुपूर साखर कारखान्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतीने पैसे दिसे जात आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांना तीन जानेवारीपर्यंतचे १० कोटी ३ लाख रुपये दिले आहेत. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन म्हणाले, शेखुपूर साखर कारखान्याने तीन जानेवारीपर्यंतचे पैसे दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तीन जानेवारीपर्यंत ऊस पाठवला आहे, ते आपले पैसे घेऊ शकतात.