नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार, नोव्हेंबर २०२४ साठी २२ लाख मेट्रिक टन (LMT) चा मासिक कोटा मंजूर केला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये वाटप करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा हा कमी आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये सरकारने दोन टप्प्यात एकूण २३ लाख मेट्रिक टनाचा कोटा जारी केला होता. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात १५ लाख मेट्रिक टन तर नंतर ८ लाख मेट्रिक टन साखर कोटा मंजूर करण्यात आला होता. तर गेल्या महिन्यात, ऑक्टोबर २०२४ साठी सरकारने २५.५ लाख मेट्रिक टन साखर कोटा वितरण केले होते. बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीचा काळ संपत आल्याने आणि नव्या हंगामाची सुरुवात होत असल्याने बाजारात स्थिरता राहील, अशी शक्यता आहे. सरकार साखरेच्या किमती स्थिर राखण्यासाठी पावले उचलत आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.