नवी दिल्ली:केंद्रीय अन्न मंत्रालयाने २६ जून रोजी केलेल्या एका घोषणेनुसार, जुलै २०२४ साठी २४ लाख मेट्रिक टन(LMT) चा मासिक साखर कोटा मंजूर केला आहे.जुलै २०२३ मध्ये वाटप करण्यात आलेल्या २४ LMT इतकाच समान कोटा मंजूर करण्यात आला आहे.हा कोटा एक जुलैपासून लागू होईल.जून २०२४ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी २५.५० लाख मेट्रिक टन कोटा मंजूर करण्यात आला होता. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, कोट्याबद्दलची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत बाजारातील किमती १५ ते २० रुपये प्रती क्विंटलची वाढ दिसून आली आहे.
जुलैचा कोटा घटल्याने साखर दरात वाढीची शक्यता ?
जून महिन्याच्या तुलनेत आता कोटा दीड लाख टनांनी कमी केल्याने साखरेच्या दरात प्रती क्विंटल किमान १५ ते २० रुपये वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. कोटा कमी केल्याने कारखानादांराना दरवाढीचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साखरेच्या हमीभावातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल ३१०० रुपये आहे. हा दर प्रतिक्विंटल ४२०० रुपये करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर संघ व ‘ईस्मा’ने केली आहे. यावर केंद्र सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू असून आठवडाभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी साखरेच्या दरात वाढ करून साखर कारखान्यांना उभारी देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती दिली होती. मागच्या गळीत हंगामातील महाराष्ट्रासह देशभरातील साखर उत्पादनाचे चुकीचे आकडे केंद्र सरकारला देण्यात आले. त्यामुळे साखर तसेच इथेनॉलच्या निर्यातीवर बंदी घातली. आता साखरेचा किमान विक्रीदर ४२ रुपये प्रतिकिलो करावा