पुरनपूर : परिसरातील उसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या भागात ऊस लागवड क्षेत्रात २.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पुरनपूर समितीच्या कार्यक्षेत्रात २,१६०७.२७६ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले होते. यावेळी २,२१३९.७८२ हेक्टरमध्ये उसाचे पीक बहरले आहे. सरासरी उत्पादनही एकरी २५ क्विंटलने वाढले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पूरनपूर विभागातील ऊस एलएच साखर कारखाना, गुलरिया साखर कारखाना, बारखेडा साखर कारखाना आणि पिलीभीतच्या संपूर्णनगर साखर कारखान्याला दिला जातो. गेल्यावर्षी पुरनपूर सहकारी ऊस सोसायटी परिसरात लागण ऊस १२,३९१.९८१ हेक्टर, खोडवा ऊस ९,२१५.२९५ हेक्टर होता. यंदा अनुक्रमे १०,९०० हेक्टर आणि ११,२३९.२५३ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. पुरनपूर सहकारी संस्थेचे ३३,६०० सभासद आहेत.
पूरनपूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा ८७०० हेक्टरमध्ये ऊस पिक आहे. इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही ऊस क्षेत्र वाढले आहे. यावर्षी विभागात १३,२३५, १४२०१, १५०२३ या प्रजातींच्या उसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी उत्पादन प्रती हेक्टर ८०५ क्विंटल होते. यंदा ८३० क्विंटल प्रती हेक्टर झाले आहे, असे ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक संजय श्रीवास्तव यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऑनलाइन घोषणापत्रासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. किटकनाशकावर अनुदान दिले जात असल्याचे ते म्हणाले.