लातूर : मांजरा साखर परिवारातील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीजने चालू गळीत हंगामात २ लाख ३१ हजार ७० मेट्रिक टन उसाचे गाळप करून २ लाख ४ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याने उत्पादित केलेल्या ४ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन माजी मंत्री, सहकार महर्षी कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
कारखान्यात साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर कृषी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, ‘जागृती शुगर’चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, ॲड. प्रवीण पाटील, प्रा. शशिकांत कदम, गोविंदराव देशमुख, संभाजी सुळ, सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे, मालबा घोणसे, देवानंद कोटे आदी उपस्थित होते.