चंदीगढ : मोहालीस्थित एका स्टार्टअपला ऊस पिकातील संशोधनासाठी २० लाख रुपयांचे उत्पादन अनुदान (grant) मिळाले आहे. Agmitra Technologies Private Limited ने स्मार्ट फार्म ग्रॅंट चॅलेंज (SFGC) कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात योग्यतेसाठी सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI), केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत मदत मिळवली होती.
याबाबत दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मोहालीतील स्टार्टअप वगळता विभागातील तीन आणखी स्टार्टअप्सना २० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील एग ऑटोमेट प्रायव्हेट लिमिटेड, बेंगळुरूस्थित सत्ययुक्त अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जी. बी. पंत युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नोलॉजी, पंतनगर, उत्तराखंड यांचा समावेश आहे. आता प्रत्येक स्टार्टअप पुढील सहा महिन्यात एका उत्पादनाचा विकास करेल आणि त्यापैकी एकास अखेरीस विजेता म्हणून जाहीर करण्यात येईल.
अंतिम विजेत्याला आपल्या प्रोजेक्टचे व्यवस्थापन आणि देखभालीसाठी पहिल्या वर्षी ५० लाख रुपये आणि पुढील दोन वर्षांपर्यंत प्रती वर्ष १० लाख रुपये मिळणार आहेत. यानंतर तीन वर्षानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संस्था आणि साखर कारखान्यांकडून वापरासाठी १०० एकर भूखंड क्षेत्रावर यशस्वी संशोधनासाठी याचा वापर केला जाईल. विजेता स्टार्टअप पुढील दोन वर्षांसाठी शेतकऱ्यांना सल्ला देईल.
एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार यांनी सांगितले की, एसएफजीसी कार्यक्रम ९ मे, २०२२ रोजी सुरु करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात विचाराचा टप्पा होता. यामध्ये आम्ही १० शॉर्टलिस्ट केलेल्या स्टार्टअपला ५-५ लाख रुपये वितरीत करण्यात आले. ते चांगल्या प्रकारे ऊस पिकाचे उत्पादन करावे यासाठी नियोजन केले. यापैकी चार ज्युरींद्वारे शॉर्टलिस्ट केले गेले आणि उत्पादन विकास अनुदान समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी २०-२० लाख रुपये देण्यात आले. ते म्हणाले की, एसटीपीआयला एकूण ४७४ प्रस्ताव मिळाले होते.