नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) नुसार, देशभरातल्या साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 पासून 30 एप्रिल 2020 दरम्यान 258.01 लाख टन साखर उत्पादन केले आहे. हे उत्पादन गेल्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 321.71 लाख टनाहून 63.70 लाख टन कमी आहे. साखर उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे.
90 साखर कारखान्यांच्या तुलनेत 30 एप्रिल 2019 ला त्यांनी ऊस गाळप केले होते, या वर्षी 30 एप्रिल 2020 ला 112 साखर कारखाने ऊसाचे गाळप करत आहेत.
उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी 30 एपिल 2020 पर्यंत 116.52 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, जे गेल्या वर्षी याच तारखेच्या 112.80 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत 3.72 लाख टन अधिक आहे.
महाराष्ट्रात 30 एप्रिल 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 60.67 लाख टन होते. तसेच गेल्या हंगामात याच तारखेला 107.15 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकातील सर्व ऑपरेटींग साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे आणि 30 एप्रिल 2020 पर्यंत 33.82 लाख टन साखर उत्पादन केले आहे.
30 एप्रिल 2020 पर्यंत, तमिळनाडु मध्ये साखर उत्पादन 5.41 लाख टन होते. तसेच गेल्या वर्षी याच तारखेला 7.02 लाख टन उत्पादन झाले होते. गुजरातमध्ये 30 एप्रिल 2020 पर्यंत 9.02 लाख टन साखरेचे उत्पादन केले आणि केवळ १ कारखाना सुरु आहे.
उर्वरीत आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान आणि ओडिसा मध्ये सामूहिक पद्धतीने 30 एप्रिल 2020 पर्यंत 32.57 लाख टन उत्पादन केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.