सोलापूर : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सध्या कारखान्याची गाळप क्षमता १२,५०० मेट्रिक टन असून त्यामध्ये वाढ करून २० हजार मेट्रिक टन क्षमता करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
आ. शिंदे म्हणाले, कारखान्यातील ३८ मेगावॉट वीज निर्मितीचा सहवीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवून ४९ मेगावॉट करण्यात येणार आहे. २००१ मध्ये कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन होती. त्यामध्ये वेळोवेळी वाढ करून आतापर्यंत १२,५०० मेट्रिक टन क्षमता करण्यात आली आहे. नुकत्याच संपलेल्या हंगामात कारखान्यात १८ लाख ४१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. त्याचबरोबर कारखान्याचा प्रतिदिन 300 केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प व्यवस्थित सुरू असल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले.