पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेकडून २०० BPS व्याज दरवाढीची शक्यता

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार काहीही करण्यात तयार आहे. आयएमएफने मदत मिळविण्यासाठी ज्या कठोर अटी घातल्या आहेत, त्यासुद्धा मानल्या जात आहेत. यादरम्यान, महागाईच्या वणव्यात जनता भरडली जात आहे. अलिकडेच करवाढीच्या झटक्यनंतर पाकिस्तानच्या बँकेकडून जो निर्णय घेतला जात आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या आर्थिक संकटापासून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. बिझनेस टुडेने म्हटले आहे की, पाकिस्तानात व्याज दरवाढीची तयारी सुरू आहे. हे दर २० -५० बेसिस पॉइंट्स नसुन २०० BPS ची वाढ यात केली जाईल. यामध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानची सेंट्रल बँक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने पुढील आठवड्यात ऑफ सायकल आढाव्यात व्याज दरात २०० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याची तयारी करीत आहे. सध्याच्याा व्याज दर १७ टक्के आहे. त्यामुळे जनतेला मोठा झटका बसू शकतो. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानचा परकीय चलन साठा ३ अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. आयएमएफची १.१ अब्ज डॉलरची मदतही रखडली आहे. चीनने देशाला ७० कोटी डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानात सध्या महागाईचा दर ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here