पांडुरंग कारखान्याकडे २००० हेक्टर क्षेत्रातील उसाच्या वाढीव नोंदी: चेअरमन प्रशांत परिचारक

सोलापूर :कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ साठी सुमारे १०,५०० हेक्टर क्षेत्राच्या ऊस नोंदी आहेत. त्यमध्ये आणखी १५०० ते २००० हेक्टर क्षेत्राच्या वाढीव नोंदी होतील असा अंदाज आहे.हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असून त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.चेअरमन परिचारक यांच्या हस्ते कारखान्याच्या सन २०२४-२५ गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

चेअरमन परिचारक यांच्या हस्ते आणि व्हा.चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांच्या उपस्थितीत रोलर पूजन झाले.कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, पाटील, दिलीप गुरव, सिताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here