कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २०२१-२२ ची थकबाकी अदा : केंद्र सरकार

नवी दिल्ली : सरकारच्या साखर क्षेत्राबाबतच्या धोरणांमुळे साखर कारखानदारांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे कारखान्यांनी गेल्या साखर हंगामातील शेतकऱ्यांची देणी जवळपास पूर्णत: निकाली काढवी आहे, असे सरकारने म्हटले आहे.

युनीवार्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत शुक्रवारी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की साखर हंगाम २०२१-२२ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ९९.९ टक्के ऊस थकबाकी साखर कारखान्यांनी आधीच अदा केली आहे. चालू साखर हंगाम २०२२-२३ साठीसुद्धा १.०५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ऊस बिले देण्यात आली आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे ९३ टक्के ऊस बिले दिली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here