इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) नव्या रिपोर्टनुसार सध्याच्या २०२२-२३ या हंगामात १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १९.९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत २०.८ लाख टन साखर उत्पादीत झाली होती.
देशाच्या पश्चिमेकडील राज्यातील काही साखर कारखान्यांना या हंगामात गाळप सुरू करण्यात उशीर झाला आहे. त्यामुळे या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत साखर उत्पादन थोडे कमी आहे.
बंदरांमधील माहिती आणि बाजारातील रिपोर्टनुसार, आतापर्यंत साखर निर्यातीसाठी आतापर्यंत साखर निर्यातीचे जवळपास ३५ लाख टनाचे करार करण्यात आले आहेत. यातील जवळपास २ लाख टन साखर निर्यात ऑक्टोबर २०२२ पर्यंत देशातून बाहेर गेली आहे. तर गेल्यावर्षी या महिन्यात जवळपास ४ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती.
अनेक व्यापाऱ्यांनी २०२२-२३ या हंगामासाठी सरकारने निर्यात धोरण जाहीर करण्यापूर्वी करार केले आहेत.