हंगाम २०२४-२५ : महाराष्ट्रातील साखर उत्पादन पोहोचले ६० लाख टनांपर्यंत; १४ कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : राज्यात चालू साखर हंगाम २०२४-२५ मध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत १४ कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले आहे असे साखर आयुक्तालयाच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीच्या तुलनेत बंद झालेल्या कारखान्यांची संख्या सातने अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर परिसरातील १२ कारखाने आणि नांदेड परिसरातील २ कारखान्यांचा समावेश आहे.

चालू हंगामात, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन ६०२.१९ लाख क्विंटल (सुमारे ६०.२१ लाख टन) झाले आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीत उत्पादित झालेल्या ७१७.५६ लाख क्विंटलपेक्षा हे उत्पादजन कमी आहे. सध्या १८६ कारखाने ऊस गाळप करीत आहेत. तर १४ कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत, राज्यातील कारखान्यांनी ६६०.४१ लाख टन ऊस गाळप केले. गेल्या हंगामात समान कालावधीत ७४१.१३ लाख टन ऊस गाळप झाले होते. राज्याचा एकूण साखर उतारा ९.१२ टक्के आहे. हा साखर उतारा गेल्या हंगामातील समान कालावधीतील ९.६८ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दरम्यान, उद्योग तज्ज्ञांच्या मते, या हंगामात कमी उत्पादन आणि वाढत्या गाळप क्षमतेमुळे कारखान्यांनी आधीच कामकाज थांबवले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळवणे आणि कमी उत्पादनामुळे राज्यातील साखर उत्पादन गेल्या हंगामापेक्षा कमी आहे. सोलापूरमध्ये ४५ कारखाने कार्यरत होते. यात १७ सहकारी आणि २८ खाजगी कारखान्याचा समावेश होता. यापैकी १२ कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला आहे. सोलापूरच्या कारखान्यांनी ११४.११ लाख टन उसाचे गाळप करून ९०.२६ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. त्यांचा साखर उतारा ७.९१ टक्के आहे. नांदेडमध्ये, ९ सहकारी आणि २० खाजगी कारखान्यांनी ७४.९ लाख टन ऊस गाळप करून ६९.९२ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले. त्यांचा साखर उतारा ९.३४ टक्के आहे. चालू हंगामात, दोन साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here