नवी दिल्ली : पावसाने अजूनही देशभरात आपली दहशत कायम ठेवली आहे. पावसामुळे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झालेले आहे. पुरामुळे कित्येक राज्यातील स्थिती गंभीर आहे. उत्तराखंडातील उत्तरकाशी येथे ढगफुटीमुळे दोन दिवसात 21 जणांचा मृत्यू झाला. ढगफुटीनंतर पूरग्रस्तांना वाचवणे, त्यांना बाहेर काढण्याचे अभियान सेनेमार्फत सुरु आहे. रविवारच्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 24 लोकांचा मृत्यू झाला.
उत्तरकाशी जिल्ह्यातील अरकोट, मकुरी आणि तिकोची गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेंच 10 लोक गायब आहेत. पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही पुराचा इशारा दिला आहे. यमुनेेचे पाणीही धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने सरकारने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.