भारतात कोरोना विषाणूचे २,११,२९८ नवे रुग्ण, ३,८४७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,११,२९८ रुग्ण आढळून आल्यानंतर देशातील एकूण संक्रमितांची संख्या २,७३,६९,०९३ झाली आहे. तर देशात विषाणू संक्रमण झाल्यानंतर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९० वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी आठ वाजता दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३,८४७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढून ३,१५,२३५ वर पोहोचली.

उपलब्ध आकडेवारीनुसार बुधवारी २१,५७,८५७ नमुने तपासण्यात आले. देशात एकूण ३३,६९,६९,३५३ नमुने तपाण्यात आले असून नमुन्यांमधून आढळून येणाऱ्या संक्रमणाची टक्केवारी ९.७९ इतकी आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सलग तिसऱ्या दिवशी नमुन्यातून आढळणाऱ्या संक्रमणाची टक्केवारी २०पेक्षा कमी आहे. साप्ताहिक संक्रमण दरही १०.९३ टक्क्यांवर आला.

देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घसरून २४,१९,९०७ झाली असून ती एकूण आकडेवारीच्या ८.८४ टक्के आहे. तर कोरोनातून २,४६,३३,९५१ जण पूर्णपणे बरे झाले असून त्याची राष्ट्रीय टक्केवारी ९०.०१ इतकी आहे. कोरोनाचा मृत्यूदर १.१५ टक्के आहे.

देशात गेल्या वर्षी सात ऑगष्ट रोजी संक्रमितांची संख्या २० लाखावर गेली. नंतर २३ ऑगष्टला ३० लाख, पाच सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख संक्रमीत झाले होते. त्यानंतर ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाखांवर रुग्ण झाले. २० नोव्हेंबरला ही संख्या ९० लाखांवर गेली. तर १९ डिसेंबरला ही संख्या एक कोटी आणि चार मे रोजी दोन कोटीवर पोहोचली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here