शाहजहांपूर : प्रगतशील शेतकरी कौशल मिश्रा यांनी २१७० क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा मार्ग दाखवला आहे. या विक्रमाबाबत त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कांट विभागातील गंगानगर गावातील शेतकरी कौशल मिश्रा हे गेल्या काही वर्षांपासून प्रगतशील शेतीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी गव्हाबरोबरच इतर पूरक पिकांचे उत्पादन घेतले आहे. रासायनिक खतांचा संतुलित वापर करून सर्व पिकांचे उत्पादन वाढवले आहे. त्यांनी जैविक शेतीबाबत अधिक रस घेतला आहे. गेल्या वर्षी २५ एकर ऊस पिकात प्रयोग केला होता. अशाच पद्धतीने रब्बी हंगामात गव्हाच्या कापणीनंतर खतांची तयारी करून शेताचे पिक फेरपालट केला. खरेतर उसाची प्रती हेक्टर उत्पादकता ८०० ते १२०० क्विंटल असते. मात्र, नायट्रोजन आणि हरीत खाद्य यातून २१७० क्विंटल प्रती हेक्टर उत्पादकता हा उच्चांक निर्माण झाला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कौशल यांनी सांगितले की, जैविक खतांच्या वापराने उत्पादित केलेल्या शिमला मिरचीला बाजारात दुप्पट दर मिळाला. त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात तीन लाख हेक्टर शेत जमिनीवर २० टक्के भागात भात, ऊस, गहू, भाजीपाला पिकवला जात आहे. जैविक पद्धतीने उत्पादीत धान्य, भाजीपाल्याला ५० ते ६० टक्के जादा दर मिळत आहे. कौशल यांनी दूरदर्शनवरही याबाबतही माहिती दिली आहे. नेपाळ, थायलंड अशा देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये शेतकऱ्यांना ऊस यांत्रिकीकरणाबाबत मार्गदर्शन केले आहे. जैविक शेतीसाठी पूर्वतयारी गरजेची असल्याचे कौशल मिश्रा यांनी सांगितले.