‘कुंभी-कासारी’कडून २२ कोटींची ऊस बिले अदा : चेअरमन चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने उसाची रुपये प्रती टन ३२०० रुपये याप्रमाणे होणारी २१ कोटी ९९ लाख ७१ हजार रुपयांची ऊस बिले उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही माहिती दिली. कारखान्यांनी कारखान्याने ६८ हजार ७४० मे. टन गाळप केले असून चालू हंगामातील १५ डिसेंबरअखेर गळीतास आलेल्या उसाला प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे नरके यांनी सांगितले.

चेअरमन नरके म्हणाले की, कारखान्याचे गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद यांनी संपूर्ण पिकविलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे. यावेळी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, कामगार प्रतिनिधी दीपक चौगले, नामदेव माने व सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here