केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३० जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑगस्ट महिन्यासाठी देशातील ५६७ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.
या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर वितरण करण्यात आले आहे. अन्न मंत्रालयाने जुलै २०२२ साठी २१.४४ लाख टन साखर विक्री कोट्यास मंजुरी दिली होती. दुसरीकडे ऑगस्ट २०२१ च्या तुलनेत यावेळी जादा साखर वाटप करण्यात आले आहे. सरकारने ऑगस्ट २०२१ साठी २१ लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.
बाजारातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पवित्र हिंदू महिना श्रावण सुरू झाल्याने बाजारातून चांगली मागणी पाहायला मिळू शकेल. यासोबतच रक्षा बंधन, तीज, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे सण ऑगस्ट २०२२ या महिन्यात आहेत.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा वितरण पद्धती लागू केली आहे.