सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकत्याच संपलेल्या हंगामातील २२६ कोटी ४२ लाख लाख रुपये थकीत आहेत. साखर कारखान्यांनी आगामी हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र मागील हंगामातील थकीत देणी कधी मिळणार ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून कारखान्यांनी थकीत बिले द्यावीत, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आगामी हंगामात शंबर टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांनाच गाळप परवाना देणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी सोलापूरसह राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडे कोटयवधी रुपये थकीत आहेत.