केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ३० सप्टेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑक्टोबर महिन्यासाठी देशातील ४९६ कारखान्यांना साखर विक्रीचा २३.५० लाख टन कोटा मंजूर केला आहे.
या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत समान साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने सप्टेंबर २०२२ साठी २३.५० लाख टन साखर कोट्यास मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे ऑक्टोबर २०२१ च्या तुलनेत यावेळी कमी साखर कोटा दिला आहे. सरकारने ऑक्टोबर २०२१ साठी २४ लाख टन साखर कोटा दिला होता.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या एका ट्वीटनुसार, ‘सणासुदीतील मागणी लक्षात घेवून आणि साखरेच्या किमतीमधील स्थिरता टिकविण्यासाठी ऑक्टोबर २०२२ साठी २३.५० लाख टन मासिक विक्री कोटा जाहीर करण्यात आला आहे.’ केंद्र सरकारने साखरेचा जादा पुरवठा नियंत्रित करणे आणि किमतीध्ये स्थिरता आणण्यासाठी मासिक कोटा रिलिज पद्धती स्वीकारली आहे.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.