कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना (शाहूनगर परिते, ता. करवीर) निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी कौलव, कुरुकली, सडोली खालसा, महिला गट व इतर मागास गटातून २३ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार- पाटील, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील तसेच विद्यमान संचालक शिवाजी कारंडे यांचा समावेश आहे.
गट क्रमांक एक कौलवमधून विद्यमान धीरज डोंगळे, धैर्यशील पाटील- कौलवकर, माजी संचालक विश्वास पाटील, राजाराम कवडे तर करुकली गट क्रमांक चारमधून शिवाजी कारंडे, पांडुरंग पाटील, जनार्दन पाटील, हिंदुराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. गट क्रमांक पाच सडोली खालसामधून अशोकराव पवार- पाटील, भीमराव पाटील, मारुतराव जाधव, कृष्णात पाटील, शिवाजी तळेकर, तर महिला गटातून सीमा जाधव, शिल्पा कवडे यांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीलकंठ करे हे काम पाहत आहेत.