कुंभी-कासारी कारखान्याकडून २३ कोटींची ऊस बिले जमा : चेअरमन तथा माजी आमदार चंद्रदीप नरके

कोल्हापूर : येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ मार्च अखेर गळीतास आलेल्या उसास प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे होणारी २३ कोटी ९७ लाख १७ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठाधारकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दि. २२ मार्च रोजी बिले जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

चेअरमन चंद्रदीप नरके यांनी सांगितले की, कुंभी-कासारी कारखान्याकडे चालू हंगाम २०२३- २०२४ मध्ये गळीतास आलेल्या ७४,९११ मे. टन उसाची ३२०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे यावेळी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here