सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे २८५ कोटींची एफआरपी थकीत

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे लक्ष्य आपल्या ऊस बिलाकडे लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून काही कारखाने ऊस बील देण्यात आघाडीवर आहेत, तर काही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या उसाचे शंभर टक्के बील दिलेले नाही. सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २८५ कोटी रुपये थकले आहेत. राज्यात एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले २९ साखर कारखाने आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर-सोलापूर, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन-म्हैसगाव, इंद्रेश्वर शुगर-बार्शी, भैरवनाथ-विहाळ, भैरवनाथ-आलेगाव, जय हिंद-आचेगाव, धाराशिव शुगर-सांगोला या आठ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

पांडुरंग श्रीपूर व युटोपियन शुगर (१०५ टक्के), सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील (१०७ टक्के), विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब (११२ टक्के), आष्टी शुगर, गोकुळ शुगर व व्ही.पी. शुगर ( ११८ टक्के), ओंकार शुगर, चांदापुरी (११३ टक्के), सीताराम महाराज खर्डी (१०० टक्के), शंकर सहकारी ( १०९ टक्के), तर आवताडे शुगर कारखान्याने १०३ टक्क्यांपर्यंत एफआरपी व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातीत ९६ साखर कारखान्यांनी १८१४ कोटी रुपये थकवले आहेत. तर ६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील कारखान्यांची संख्या १५ आहे. उसाचे संपूर्ण पैसे दिलेले १३ साखर कारखाने असून १० कारखान्यांनी ९० टक्क्यांपर्यंत पैसे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here