खरीफ हंगाम सत्र २०२२-२३ (खरीप पिक) मध्ये भाताची खरेदी देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये सुरळीत आहे. सद्यस्थितीत पंजाब, चंदीगढ, छत्तीसगढ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, जम्मू-कश्मीर, केरळ, तेलंगणा, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू आहे. १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत २३१ लाख मेट्रिक टन भाताची खरेदी करण्यात आली आहे. या तुलनेत गेल्यावर्षी समान कालावधीत २२८ लाख मेट्रिक टन भात खरेदी करण्यात आले होते. खरेदीमुळे जवळपास ४७,६४४ कोटी रुपये किमान समर्थन मूल्य १३.५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
यावर्षी देशात खूप चांगला पाऊस पडला आणि भाताचे उत्पादन सामान्य राहील अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम २०२२-२३ मधील खरीप पिकासाठी ७७१ लाख मेट्रिक टन भात (तांदळाच्या रुपात ५१८ लाख मेट्रिक टन) खरेदीचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. या तुलनेत गेल्या खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये ७५९ लाख मेट्रिक टन भात (तांदळाच्या रुपात ५१० लाख मेट्रिक टन) खरेदी करण्यात आले होते. यामध्ये रब्बी हंगामातील भाताचा समावेश केल्यास पूर्ण हंगाम २०२२-२३ मध्ये जवळपास ९०० मेट्रिक टन भात खरेदीची अपेक्षा आहे.
एनएफएसए/पीएमजीकेएवाई/ओडब्ल्यूएसची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
इतर राज्यांतही खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. आणि कोणत्याही अडचणींविना खरेदीसाठी सर्वोतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे. (Source: PIB)