कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद शुक्रवारी (दि. २५) दुपारी तीन वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होत आहे. गतवर्षी तुटलेल्या उसाचा अंतिम भाव प्रतिटन दोनशे रुपये तसेच यावर्षी तुटणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा अधिक किती मागायचे, याचा निर्णय ऊस परिषदेत होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या परिषदेच्या तयारीसाठी अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्नाटक सीमाभागात सभांचा धडाका सुरू ठेवला आहे. सोशल मीडियामधूनही गावागावांत ‘स्वाभिमानी’च्या शाखांमधून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, प्रकाश पोफळे, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
‘चीनीमंडी’शी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले कि, मागील वर्षी प्रति टन अतिरिक्त 100 रुपयांसाठी केलेल्या आंदोलनाला तब्बल आठ महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश मिळाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच ऊस परिषदेचे आयोजन केले जाते. शेट्टी यांनी शेतकऱ्यांना हजारोच्या संख्येने ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.