ऊस लागवड क्षेत्रात एक वर्षात २५.५४ टक्क्यांची घट

आजमगढ : ऊस सर्व्हेचे हंगाम २०२२-२३ साठीचे काम पूर्ण पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्वहंगामी क्षेत्रात ४१ टक्के आणि खोडवा क्षेत्रात ९.९१ टक्के घट झाली आहे. एकूण ऊस लागवड क्षेत्रात २५.५४ टक्क्यांची घट झाली आहे. सर्व्हेमध्ये या वर्षी जिल्ह्यातील दोन समित्यांचे ऊस क्षेत्र लागण ३५१०.५०५ हेक्टर आणि खोडवा ५३००.२१३ हेक्टरसह ऊस क्षेत्र ८८१०.७१८ हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये ऊस क्षेत्र लागण ५९००.८७७ हेक्टर आणि खोडवा ५८८३.३०८ हेक्टरसह एकूण क्षेत्र ११८३४.१८५ हेक्टर होते. जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांचा ६३ कॉलम डाटा पोर्टलवर उपलब्ध आहे. जर शेतकऱ्यांना यात काही त्रुटी असल्याचे आढळले तर ते पर्यवेक्षकांच्या माध्यमातून समितीकडे बदलासाठी विनंती अर्ज करू शकतात.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गावपातळीवरील ऊस सर्व्हेची मांडणी करण्याचे काम २० जुलैपासून सुरू होईल. ते ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहील. सर्व शेतकऱ्यांना आपली पावती, इतर माहिती ऊस पर्यवेक्षकांच्या माध्यमातून या काळात पाहता येईल. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी स्वयं घोषणापत्र तथा नव्या सदस्यत्वासाठी enquiry.caneup.in ही वेबसाईट सुरू आहे. शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत समितीचे सदस्यत्व घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here