माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना २५ टक्के बोनस जाहीर : कार्यकारी संचालक अशोकराव पाटील

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत कामगारांना २५ टक्के बोनस देण्याचा निर्णय झाला. हा बोनस दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत वरील धोरणात्मक निर्णय झाला. बोनसच्या माध्यमातून कारखान्याच्या कायम, हंगामी व एकत्रित वेतन घेणाऱ्या कामगारांना सुमारे सव्वा सहा कोटी रुपये मिळणार आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभाचे आयोजन गुरुवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व शांताबाई जगताप या दांपत्याच्या हस्ते समारंभ पार पडणार आहे, असे उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी सांगितले.

कामगार संचालक विलास निवृत्ती कोकरे यांनी संचालक मंडळासमोर कामगारांना ३६ टक्के बोनसची मागणी केली होती. कारखान्याने सभासदांना जसा राज्यात उच्चांकी ३,६३६ रुपये प्रती टन दर दिला तसाच कामगारांनाही उच्चांकी बोनस मिळावा, अशी मागणी केली. मात्र, चर्चेनंतर दोन टप्प्यांत २५ टक्के बोनस देण्याचे ठरले. कायम, हंगामी व एकत्रित वेतन घेणाऱ्या कामगारांना हा २५ टक्के बोनस मिळेल. तर रोजंदारीवरील कामगारांना साडेआठ हजार रुपये देण्यात येतील. कारखान्याने एफआरपीपेक्षा अधिक ८०५ रुपये जादा दर दिला आहे. सभासदांना ३,६३६ रुपये प्रती टन दर आधी जाहीर केला गेला आहे. सध्या एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात ‘माळेगाव’ राज्यात आघाडीवर आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here