शाहू साखर कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत बाल गटात २५० मल्लांचा सहभाग

कोल्हापूर : येथील श्री शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरु असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी चौदा वर्षांखालील बालगटात २५० मल्लांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उ‌द्घाटन कागलच्या घाटगे घराण्याचे युवराज आर्यवीर घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्पर्धा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक स्पर्धेच्या पद्धतीने होत आहेत. स्पर्धेचे हे ३७ वे वर्ष आहे. दोन मॅटवर कुस्त्या होत आहेत.

येथील शाहू उद्यानातून क्रीडाज्योत प्रज्वलित करून मुख्य रस्त्यावरून स्पर्धेच्या ठिकाणी आणण्यात आली. कारखाना मानधनधारक खेळाडूंनी ध्वजवंदना दिली. छत्रपती शाहू महाराज, विक्रमसिंह घाटगे व क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम, सतीश पाटील, संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाल गटात हे मल्ल पुढील फेरीत…

साईराज ढोणे, श्रीवर्धन मगदूम, रितेश यादव, रणवीर चौगुले, हर्षद माने, राजवर्धन पाटील, परवेज नायकवडी, यस टेबे, ओंकार काशीद, पृथ्वी शिरोळे, शार्दूल बोडके, अर्जुन पाटील, वेदांत पाटील, समर्थ वडार प्रणव जाधव, हर्षवर्धन डाफळे, सोहम चौगुले, रुट लोडे, गणेश मुधाळे, सिवेट कुमार पाटील, दिग्विजय पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, करण तोड़कर, सार्थक शेळके.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here