‘नॅचरल’ च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस जाहीर : कृषीरत्न बी. बी. ठोंबरे

धाराशिव : केंद्र सरकारच्या दोलायमान अवस्थेतील निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात असल्याचे कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या कामगार संघटना आणि संचालकांची बैठक झाली. सदर बैठकीमध्ये बोनसबाबत चर्चा होवून कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी २६ टक्के बोनस देण्यात येईल, असे सांगितले.

ठोंबरे म्हणाले, मराठवाड्यातील साखर उद्योग ऊसाची उपलब्धता व पाणी टंचाई या दोन्ही समस्यांनी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या खाईत सापडलेला मराठवाड्यातील साखर उद्योग यशस्वी करून दाखविण्याचे काम नॅचरल शुगरने केले असून, ता नफ्यात आणण्याचे कौशल्य साध्य केले आहे. आणि ते केवळ साखर कारखान्याबरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून आणि कर्मचारी व ऊस उत्पादकांचे सहकार्यामधून झाले आहे. मला जे कांही द्यावयाचे आहे ते माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कर्मचारी बांधवांनाच द्यावयाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सभेमध्ये सांगितले.

चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने मांजरा धरण भरले व त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात हात आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने निर्धारीत केलेले ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. सदर बैठकीस कारखान्याचे संचालक, जनरल मॅनेजर, कर्मचारी संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here