नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील मुंडका विभागात शुक्रवारी, १३ मे रोजी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आगे. या बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या कंपनीच्या २ मालकांनाही अटक करण्यात आली आहे. या भयानक दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी मृतदेहांची डीएनए टेस्ट केली जाईल. आगीत भाजलेल्या १२ जणंवर हॉसपिटलमध्ये उपचार सुरू असून बचावासाठी फायर ब्रिगेडसह एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.
ओपी इंडिया डॉट कॉमवरील वृत्तानुसार, दिल्लीतील मुंडका विभागातील या आगीत २५ जण अद्याप बेपत्ता आहेत. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार कंपनीचे मालक हरीश गोयल, वरुण गोयल यांना अटक केली आहे. बिल्डिंगचे मालक मनीष लाकडा हे फरार झाले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची छापेमारी सुरू आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कारखाना होता. दुसऱ्या मजल्यावर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. येथे गोडावून असल्याचे सांगण्यात आले. फायर ब्रिगेड आणि एडीएफआरएफने अद्याप कोणी अडकले आहे का, हे तपासणीसाठी शोध सुरू ठेवला आहे. पंतप्रधाना कार्यालयाने मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.