‘तौकते’ चक्रीवादळाशी लढण्यासाठी २९ टीम सज्ज, या राज्यांना अधिक धोका

नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देत असलेल्या देशातील अनेक राज्यांना आता तौकाते चक्रवादळाचा धोका भेडसावत आहे. या चक्रीवादळाशी लढा देण्याची तयारी सुरू झाली आहे. या चक्रीवादळाचा फटका केरळ, कर्नाटक, तमीळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्राला बसू शकतो. यासाठी या राज्यांमध्ये २९ टीम तैनात करण्यात आली आहेत. तर आणखी जादा २९ टीम तयार ठेवण्यात येतील. गरज भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळ यांच्या समुद्र किनाऱ्यावर १५ ते १७ मे या काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा समुद्रात तयार झाला आहे. पुढील २४ तासात हे चक्रीवादळ गंभीर स्थितीत येऊ शकते अशी शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर १५ ते १७ मे या काळात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल. जोरदार वारे वाहतील. महाराष्ट्रतील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह गोव्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकटांनी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. महाराष्ट्रातील कोकण, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ १८ मे रोजी पोहोचेल आणि गुजरात, पाकिस्तानच्या किनाऱ्यावर पोहोचेल.

सलग पाच दिवस समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा प्रभाव राहील. या चक्रीवादळाचा उगमबिंदू दक्षिण पूर्व अरबी समुद्रात असेल. १६ मे रोजी याचा प्रभाव सर्वाधिक असेल. तर यानंतर हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला जाईल. मुंबईत याचा परिणाम १७ मे रोजी जाणवेल. त्यानंतर ते १८ मे रोजी गुजरात, पाकिस्तानच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here