अथणी-रयत शुगर्सचे ३ लाख ६६ हजार टन ऊस गाळप : मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील

कराड : अथणी शुगर्सच्या शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत युनिट या साखर कारखान्याने या हंगामात ३,६६,४२० मे. टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने गळीत केलेल्या ऊसाचे फेब्रुवारीअखेर ३,१५० रुपयांप्रमाणे ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ ची सांगता झाली. त्यावेळी पाटील बोलत होते.

यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथणी कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सीएफओ योगेश पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशांत पाटील व युनिट हेड रविंद्र देशमुख उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले की, अथणी रयत शुगर्स कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प देखील कार्यान्वित झाला असून वीजेची निर्यात सुरू झाली आहे. चालू हंगाम ११४ दिवसांचा घेतला असून ११.०७ टक्के साखर उतारा राखत ४,०५, ५६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. यावेळी सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here