कोल्हापूर : अथणी शुगर लिमिटेडच्या भुदरगड युनिटने १०७ दिवसात ३,०८, ४४९ मेट्रिक टन गाळप केले आहे. कारखान्याने सरासरी ११.७३ रिकव्हरीने ३,५९,२७० क्विंटल इतकी साखर उत्पादित झाल्याची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. कारखान्याने यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू ठेवला असून त्यासाठी योग्य नियोजन केले आहे, असे ते म्हणाले.
मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील म्हणाले की, अथणी शुगर्सचे चेअरमन श्रीमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील ऊसाचे उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमची नियोजित क्रशिंगकडे वाटचाल सुरू आहे. कारखान्याने २०२३-२४ हंगामातील १६ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंतची ऊस बिले विनाकपात एकरकमी प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत. कारखान्याने १५ फेब्रुवारीपर्यंतची तोडणी वाहतुकीची बिले जमा केली आहेत.
यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, डे. चीफ केमिस्ट प्रकाश हेद्रे, शेती अधिकारी राजाराम आमते, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब देसाई, जमीर मकानदार, कन्हैया गोरे, शिवाजी खरुडे, सतीश पाटील, अमृत कळेकर, दिलीप गायकवाड, प्रवीण बेवनूर, संताजी देसाई, मुराद काझी आदी उपस्थित होते.