महाराष्ट्रातील ऊस हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत सोलापूर विभागातील ४२ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३१ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १०८ कारखाने बंद झाले आहेत.
साखर उताऱ्यामध्ये राज्यात कोल्हापूर सर्वात आघाडीवर आहे. कोल्हापूरचा सरासरी साखर उतारा १२ टक्क्यांजवळ आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत कोल्हापूरचा साखर उतारा ११.९९ टक्के आहे. चालू गळीत हंगामात कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी भाग घेतला. सोलापूर विभागात ४ एप्रिल २०२१ अखेर सर्वाधिक ४२ कारखाने गाळप हंगामात सहभागी होते.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला. राज्यात ९७२.३० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंत १०१७.४२ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के इतका आहे.