हरियाणातील साखर कारखाने ५ जुलैपर्यंत देणार ३१४ कोटींची थकीत ऊस बिले

चंदीगढ : हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल यांनी सर्व सहकारी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे थकीत ३१४ कोटी रुपये कोणत्याही परिस्थितीत ५ जुलैपर्यंत अदा करण्याचे आदेश दिले आहेत. खासगी कारखान्यांनीही थकबाकी त्वरीत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी साखर कारखान्यांच्या थकबाकीचा आढावा घेतला. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावर त्यांनी निर्देश दिले की, साखर कारखान्यांनी थकबाकी देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बैठकीत सांगण्यात आले की, नारायणगड साखर कारखान्याकडून २०२१-२२ या हंगामात शेतकऱ्यांना १७२.६९ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत ५९.१५ कोटी रुपयेही लवकर दिले जातील. या हंगामात सर्व सहकारी कारखान्यांना मे अखेरपर्यंत ७८.९२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यामध्ये सरस्वती साखर कारखान्याला २९.२८ कोटी रुपये, पिकाडली अॅग्रो लिमिटेड भादसोला १२.८४ कोटी रुपये, नारायणगढ कारखान्याला ८.६० कोटी रुपये आणि असंध कारखान्याला ६.३९ कोटी रुपये देण्यात आले

आहेत. बैठकीत वित्त विभागाचे टीवीएसन प्रसाद, कृषी विभागाचे डॉ. सुमिता मिश्रा, कृषी विभागाचे महासंचालक हरदीप सिंह, अंबालाचे उपायुक्त विक्रम, हरको बँकेचे मुख्य व्यवस्थापक राहुल उप्पल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here