संताजी घोरपडे कारखान्याकडून ३,१५० प्रमाणे एफआरपी जमा : अध्यक्ष नविद मुश्रीफ

कोल्हापूर : चालू हंगामात गळितासाठी आलेल्या उसाला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने प्रती टन ३,१५० रुपये याप्रमाणे एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. शुक्रवार, दि. १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी बँक खात्यामधून पैसे मिळतील अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. साखर कारखान्याच्य विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे लवकरच या उद्घाटन होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

अध्यक्ष नावेद मुश्रीफ म्हणाले की, संताजी घोरपडे साखर करखान्याने यंदा प्रती टन ३१०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबरअखेर, पहिल्या पंधरवड्यात गाळप केलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प सुरुवातीला ३०,००० लिटर क्षमतेचा होता. २०१८ मध्ये त्यात ५० हजार लिटरपर्यंत वाढ करण्यात आली. आता इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दररोज १ लाख लीटर्स निर्मिती क्षमतेच्या प्रकल्पात सिरपपासून दररोज एक लाख लीटर उत्पादन सुरू आहे. ३० टन क्षमतेच्या बॉयलरसह ३.२ मेगावॅट टर्बाईन असे विस्तारीकरण झाले आहे.

अध्यक्ष मुश्रीफ यांनी निवेदनात म्हटले आहेकी, कारखान्याने २०२३-२४ या हंगामात ऑईल कंपन्यांकडून एक कोटी ४० लाख लीटर इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाला आहे. त्यापैकी सिरपपासून ११ लाख लीटर्स इथेनॉल निर्मिती झाली आहे. तर चार लाख लीटर इथेनॉलची निर्यात पूर्ण झाली आहे अशी माहितीही पत्रकात नमुद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here