कोल्हापूर : अथणी शुगर्स बांबवडे शाहूवाडी युनिटने प्रतिटन ३२०० रुपयाप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंतची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली. गळीत हंगामाचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात झाला. गतवर्षी कारखान्याचे विस्तारीकरण केले असून, गाळप क्षमता २५०० मे. टन प्रतिदिनवरून ५५०० मे. टन प्रतिदिन केली आहे. या वर्षी कारखाना चालू होण्यास थोडा विलंब झाला तरी ३० दिवसांत ८८९३० मे. टन गाळप पूर्ण करत सरासरी साखर उतारा १०.२० टक्केने ८१५२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामास पावसामुळे थोडा विलंब झाला आहे. तरी ऊस पुरवठाधारक शेतकरी, तोडणी, ऊस वाहतूकदार यांनी गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून उच्चांकी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, युनिट हेड रवींद्र देशमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ‘अथणी-बांबवडे’ची ३२०० प्रमाणे बिले जमा : कार्यकारी संचालक योगेश पाटील
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 06/03/2025
ChiniMandi, Mumbai: 06th Mar 2025
Domestic Market
Weak sentiment witnessed in domestic sugar prices
Domestic sugar prices in the major markets of Karnataka, Maharashtra, and Uttar Pradesh...
गन्ने की तौल के लिए करना पड़ रहा है लंबा इंतजार, किसान परेशान
सीतापुर : उत्तर प्रदेश में एक तरफ जहां गन्ना पेराई सीजन खत्म होने के कगार पर है, वाही दूसरी ओर गन्ने की तौल के...
उत्तर प्रदेश : मीरगंज चीनी मिल द्वारा गन्ना किसान गोष्ठी का आयोजन
बरेली : धामपुर बायो ऑर्गेनिक्स लिमिटेड की मीरगंज चीनी मिल द्वारा आयोजित गन्ना किसान गोष्ठी में पद्मश्री डॉ. बख्शी राम ने किसानों को सह...
मौसम अनुकूल रहने पर इस सीजन में गेहूं उत्पादन में सुधार की उम्मीद
नई दिल्ली: द बिजनेस स्टैंडर्ड की रिपोर्ट के अनुसार, वरिष्ठ उद्योग अधिकारियों ने बताया कि,अगले कुछ हफ्तों में अनुकूल मौसम की स्थिति बनी रहने...
बारामतीत ‘एआयचा भरघोस ऊस उत्पादन व साखर उद्योगाचा आधुनिकरणासाठी वापर’ विषयावर कार्यशाळा
पुणे : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. १५) 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचा आधुनिकरणासाठी वापर' या कार्यशाळेचे आयोजन...
सातारा – सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी २३४ जण इच्छुक, अर्जांची आज छाननी
सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण २५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १७ दुबार उमेदवारी अर्ज वगळता कारखान्याच्या २१ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज...
Indian markets close higher on strong global cues; Nifty recovers from early dip
Indian equity markets ended on a positive note on Thursday, driven by strong global cues and sectoral strength in Metals, Oil & Gas, and...