कोल्हापूर : अथणी शुगर्स लिमिटेडच्या शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे-बांबवडे येथील युनिटने चालू गळीत हंगामात १५ जानेवारी २०२४ पर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊस बिलाची रक्कम एफआरपीपेक्षा जास्त दर देऊन पंधरा दिवसांत देण्याची परंपरा या वर्षी अखंड चालू ठेवली आहे. प्रती टन ३२०० रपयांप्रमाणे ऊस बिले पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याशिवाय तोडणी वाहतूकची बिलेही देण्यात आली आहेत, अशी माहिती अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
सोनवडे-बांबवडे येथील युनिटने प्रती दिन ५५०० मे. टन गाळप करत गेल्या ८५ दिवसांत ३ लाख ३५ हजार ४५५ मे. टन ऊस गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५५ टक्केने ३६३८९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामात उच्चांकी ६ लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा, असे आवाहन एक्झि. डायरेक्टर योगेश पाटील यांनी केले आहे.