कारखान्याकडून गाळप ३२५ लाख क्विंटल उसाचे, मात्र ८० टक्के बिले थकीत

शामली : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३२५.४ क्विंटल ऊस गाळप केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना २२१.२२ कोटी रुपयांची ऊस बिले मिळाली आहेत. हे प्रमाण फक्त १९.९५ टक्के आहे. सद्यस्थितीत या साखर कारखान्यांवर ८८६.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जवळपास ८० टक्के ऊस बिले थकीत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली ही थकबाकी मिळवण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाची रणनीती तयार केली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी शामली कारखान्याच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली. या कारखान्याने ९९.८१ लाख क्विंटल, ऊन कारखान्याने ९७.९९ लाख क्विंटल तर थानाभवन कारखान्याने १२७.२४ लाख क्विंटलसह ३२५.०४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. या गाळपापोटी शामली कारखान्याला ३२८.८८ कोटी रुपये, ऊन कारखान्याला ३३८.६९ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याला ४४०.४२ कोटी रुपयांसह एकूण ११०७.९८ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता होती.

प्रत्यक्षात शामली कारखान्याने ३४.२३ लाख, ऊन कारखान्याने १११.६७ कोटी रुपये आणि खानाभवन कारखान्याने ७५.३२ लाख रुपयांसह एकूण २२१.२२ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. शामली कारखान्याकडे सर्वाधिक २९४.६५ कोटी, ऊन कारखान्याकडे २२७.०२ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे ३६५.१० कोटी रुपये असे एकूम ८८६.७६ कोटी रुपये थकीत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी बहादूर सिंह यांनी या माहितीस दुजोरा दिला. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यांकडून यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here