अहमदनगर : हिरडगाव येथील गौरी शुगर डिस्टिलरी लिमिटेड युनिट क्रमांक चार या साखर कारखान्याने ३ लाख २५ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी ही माहिती दिली. गौरी शुगरने यंदा नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दोन महिन्यांत गाळपाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, गौरी शुगरने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे. सध्या साखर उतारा सरासरी १०.३० टक्के आहे. नगर जिल्ह्यामध्ये हा उतारा अग्रेसर राहील असा विश्वास आम्हाला वाटतो. गौरी शुगरने एक ते पंधरा डिसेंबरपर्यंतची २९ कोटी रुपयांची ऊस बिले संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली आहेत. गौरी शुगर सुरू झाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांचे ऊसाची बिले वेळेवर दिली आहेत. शेतकरी गौरी शुगरला प्राधान्याने ऊस देत आहेत. जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी होत नाही, तोपर्यंत कारखाना बंद केला जाणार नाही.