देशातील ३३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक

नवी दिल्ली : देशभरातील जलाशयांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेबाबत नव्या आठवड्यातही आधीचीच परिस्थिती कायम आहे. देशातील १५० धरणांमध्ये १६ मे अखेर, एकूण ४५.२७७ BCM पाणी उपलब्ध आहे. या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या हे प्रमाण २५ टक्के आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत पाण्याची उपलब्धता ५७.९९३ BCM होती. यंदा पाणीसाठ्यात १३ BCM ची घट दिसून येत आहे. देशाच्या उत्तरेकडील जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी ५.६१८ BCM आहे. हे प्रमाण जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या २९ टक्के आहे. देशभरात सुमारे ३३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

देशाच्या पूर्वेकडील भागात गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत जास्त पाणी उपलब्धतेचा कल कायम आहे. जलाशयांमध्ये एकूण जलसाठा ६.५३१ बीसीएम आहे. हे प्रमाण या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३१.९७टक्के इतका आहे. गतवर्षी याच कालावधीतील पाणीसाठा २८ टक्के होता. पश्चिमेकडील जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा, २६.११ टक्के म्हणजे ९.६९६ BCM आहे. गतवर्षी याच कालावधीत जादा, ३२ टक्के पाणी उपलब्ध होते. मध्य प्रदेशात, उपलब्ध पाणी एकूण साठवण क्षमतेच्या ३३ टक्के म्हणजेच १५.९३८ BCM आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जलसाठा ४० टक्के होता, दक्षिणेकडील जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या १४ टक्के म्हणजेच ७.४९४ बीसीएम पाणी उपलब्धता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here