साखर कारखान्यातील आगीत साखरेच्या पोत्यांसह करोडो रुपयांचे नुकसान

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील साकूरनजीक कौठे मलकापूर येथे ,युटेक शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याला शनिवारी पहाटे आग लागली. या आगीत साखरेच्या पोत्यांसह 35 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तीन वर्षांपूर्वी या कारखान्याची उभारणी केली आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साखर गोदामाजवळील साहित्य असलेल्या खोलीत लागलेल्या आगीने येथील ऑइल, ग्रीस आणि ल्युब्रीकंटने पेट घेतला. धूर निघालेला पाहून आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. सुरक्षा रक्षकाने फायर सिस्टीम सुरु करेपर्यंत ही आग भडकली. ही आग इतकी भीषण होती की, तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यास यश मिळाले.

संगमनेर साखर कारखाना, प्रवरा साखर कारखाना, देवळाली येथील अग्निशामक बंबाने या आगीवर नियंत्रण मिळविले. नुकसानीचा हा आकडा काही कोटींचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here