मुजफ्फरनगर : साखर कारखाना हंगाम २०२२-२३ मध्ये पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करेल. यासाठी कारखान्यातील मशीनरीसह बॉयलरची दुरुस्तीही केली जात आहे. यासाठी जवळपास ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ऊस विकास विभागाने जिल्ह्याच्या लागवड क्षेत्राची वाढ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर ऊस सर्व्हे बाबत प्रदर्शन केले जाईल. १.६० लाख क्विंटल प्रती दिन गाळप क्षमता असलेल्या खतौलीतील त्रिवेणी साखर कारखान्याची गाळप क्षमता जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कारखाना एका दिवसात १.६० लाख क्विंटल ऊसाचे गाळप करतो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कारखान्याला पुरेसा ऊस मिळालेला नाही.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या कारखाना प्रती दिन १.२५ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करतो. कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी सांगितले की, साखर कारखान्याची सर्व मशीनरी दुरुस्त करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च केले जातील. यासाठी या नव्या हंगामापूर्वी दुरुस्ती, देखभालीबाबतची कामे पूर्ण केली जातील. कारखान्याने गेल्या गळीत हंगामात २२५ लाख क्विंटल ऊस खरेदी केला होता. २०२१-२२ मध्ये कारखान्याचा गळीत हंगाम १९९ दिवस चालला. या दरम्यान २२५ लाख क्विंटल ऊस खरेदी केला. त्यापोटी शेतकऱ्यांना ७७७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. नव्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा असे प्रयत्न आहेत.