मुंबई : त्रिवेणी इंजीनिअरिंग अँड इंडस्ट्रीजने पुढील नऊ महिन्यात आपली डिस्टिलेशन क्षमता दुप्पट करण्यासाठी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. कंपनीने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपले योगदान देण्याचे धोरण सुरू ठेवले आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनी दोन नव्या डिस्टिलरी स्थापन करणार आहे. कंपनी आपल्या सध्याच्या दोन डिस्टिलरीची क्षमताही वाढवणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कंपनीची अल्कोहोल निर्मिती क्षमता ३२० किलोलीटर प्रती दिनवरुन वाढवून ६६० केएलपीडी करण्यात येणार आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजचे कार्यकारी संचालक तरुण साहनी यांनी सांगितले की, आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६६० केएलपीडीचे उद्दिष्ट गाठता येईल अशी अपेक्षा आहे.
कंपनीच्या धोरणानुसार, एकदा हा टप्पा गाठल्यानंतर कंपनीच्या आसवनी व्यवसायातून उत्पन्न वाढून वार्षिक १,५०० कोटी रुपये होईल. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीच्या अहवालानुसार, १०१ कोटी रुपयांच्या लाभासह डिस्टिलरीचा व्यवसाय ५४४ कोटी रुपये झाला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link